शाळासिध्दी
लेखमाला - 10
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम -
शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य
स्त्रोत – पेयजल (क्षेत्र
क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 10 )
पेयजल
पेयजल
पाण्याला जीवन
असे नाव आहे. ते एकदम सार्थ आहे. सर्व सजीवांचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे.
मानवाची पाण्याची गरज मानव जातीच्या निर्मितीपासूनची आहे. मानवी शरीरालाच नव्हे तर
मानवाच्या उत्क्रांतीसाठी, भरभराटीसाठी व प्रगतीसाठी पाणी आवश्यक आहे. यामुळेच
आदिमानव भटकंती सोडून जेव्हा एके ठीकाणी स्थिर झाला तेव्हा त्याने नदीकाठीच वस्ती
केली. त्यातूनच सिंधू, नाईल,
युफ्रेटीस इत्यादी संस्कृती उदयास आल्या. पुढे पाण्याचा साठा कमी
झाल्यामुळे व आहे ते पाणी योग्य रितीने न वापरल्यामुळेच या संस्कृती नष्ट ही
झाल्या आहेत.
पाण्याला मराठीत रस
असेही एक नाव आहे तेही अगदी सार्थ आहे. पाणी हेच मानवी शरीराचा जीवनरस आहे. मानवी
शरीर ब-याच अंशी पाण्याचे बनलेले आहे. लहान बालकाच्या शरीराचा 75 टक्के भाग
पाण्याचा असतो. हे प्रमाण हळूहळू बदलत जाऊन प्रोढामध्ये त्याचे प्रमाण ६० ते ६५
टक्के होते. मानवी शरीरामध्ये ६० ते ७५ टक्के पाणी असूनही जर शरीराभोवती जलरोधक
त्वचा नसती तर या पाण्याचे बाष्पीभवन होऊन गेले असते. सर्व सजीवांना जिवंत
राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण सदा सर्वकाळ योग्य व पुरेसे असावे लागते.
शरीरातील पाण्याच्या १० टक्क्याहून जास्त पाणी कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू
शकत नाही. मानवी शरीर अन्नाशिवाय काही आठवडे राहू शकते , पण पाण्यावाचून सात
दिवसापेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
शरीरातील
पाण्याचा दोन तृतीयांश भाग पेशीमध्ये असतो. उरलेला एक तृतीयांश भाग रक्त व इतर
द्रव्याच्या रूपाने असतो. शरीरातील प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला, प्रत्येक
स्नायूला त्याचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. तुम्ही
दिवसभराच्या दिनचर्येमध्ये कित्येक वेळा पाणी पिता, त्याचप्रमाणे रस पिता , जेवण
करता, थंड पेये पिता तेंव्हा शरीराला पाणी मिळते. त्याचप्रमाणे घाम , लघवी इत्यादी
मार्गाने पाणी बाहेर जाते. या व्यतिरिक्तही शरीरातून पाणी बाहेर जात असते. थंड
प्रदेशातील लोक जेंव्हा श्वास सोडतात किंवा बोलतात तेंव्हा त्यांच्या श्वासावाटे
पाण्याची वाफ बाहेर जातांना तुम्ही पाहिलेच असणार, याचाच अर्थ उच्छवासातून पाणी
शरीराबाहेर टाकले जाते. तसेच खूप उष्ण प्रदेशात किंवा कडक उन्हाळ्यामध्ये
त्वचेच्या सुक्ष्म छीद्रावाटे घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकले जाते. याच
पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे शरीराला थंडावा जाणवतो. अशाप्रकारे सर्वसाधारणपणे
एक लिटर किंवा जास्त पाणी शरीराबाहेर टाकले जाते. त्यामुळे शरीरातील प्रमाण जर
योग्य व पुरेसे ठेवायचे असेल तर सर्वप्रकारे शरीराबाहेर टाकलेल्या पाण्याइतकेच
किंवा जास्त पाण्याचा पुरवठा शरीराला व्हायला हवा. आवश्यक असतांना पाणी प्यालो
नाही तर तोंड व जीभ कोरडी होते.तहान लागते व शरीराला थकवा जाणवतो. शारीरातील
मिठाचे वाढते. यामुळे ह्रदयावर ताण येऊ शकतो. खूप वेळ व्यायाम केल्याने, भरपूर मैदानी
खेळ खेळल्याने खूप तहान लागते ही तहानच तुमच्या शरीराची संदेश यंत्रणा आहे. शरीरास
पाणी कमी पडत आहे व त्याचा पुरवठा त्वरित व्हावयास हवा याचा संदेश ही यंत्रणा
तुम्हास देत असते. म्हणून तहान लागली की भरपूर पाणी प्यायला हवे. रोज दोन ते चार
लिटर पाणी पिणे आरोग्यास आवश्यक आहे.
मानवी रक्तामध्ये 92 टक्के पाणी, किडनीमध्ये 83 टक्के पाणी, मेंदूत 75 टक्के पाणी, फुफ्फुसांमध्ये 86 टक्के पाणी, हाडांमध्ये 40 टक्के पाणी, स्नायूमध्ये 75
टक्के पाणी, ह्रदयामध्ये 75 टक्के पाणी, यकृतामध्ये 86 टक्के पाणी असते. अशा स्थितीत
आपण जे पाणी प्राशन करतो त्याची शुध्दता गरजेची आहे. पाण्यातून
होणा-या आजारामुळे जगभरात दररोज 5000 लोक
आजारी पडतात. काही मृत्यूमुखी देखील पडतात. म्हणून पिण्याचे पाणी शुध्द असणे आवश्यक ठरते.
शाळेत येणारा प्रत्येक
विद्यार्थी हा
6 ते 8 तास शाळेत बसत असतो. त्यांच्या शरीराला आवश्यक असणारे पाणी हे त्यांना वेळेत मिळायला हवे.
यासाठी प्रत्येक शाळेत पिण्याचे पाणी उपलब्ध असायलाच हवे.
एका माणसाला किती पाणी
लागते
?
युनोने 2000 साली
मिलेनियम गोल निश्चित केलेले आहे. त्यात पाणी अग्रक्रमावर
आहे. पाण्याचा दररोज दर व्यक्तीनिहाय होणारा वापर याचे
प्रमाण दिलेले आहे. प्रती व्यक्ती दररोज स्वयंपाक व पिण्यासाठी 15 लीटर, आंघोळीसाठी 20 लीटर, कपडे धूण्यासाठी 20
लीटर, भांडी धूणे, फरशी धूणे 35 लीटर, स्वच्छतागृह व तत्सम कार्यासाठी 45 लीटर
अशाप्रकारे एकूण 135
लीटर पाणी एका व्यक्तीला आवश्यक असते. स्वच्छता गृहातील फ्लशद्वारे
एकावेळी 12 लीटर पाणी वापरले जाते.
ग्रामीण भागातील व्यक्तीसाठी प्रतिदिन 135 लिटर तर शहरी भागातील प्रतिव्यक्ती 200
लिटर पाण्याची आवश्यकता असते. युनोच्या एका अहवालानुसार - सन 2030 पर्यंत जगातील 47 टक्के लोकांना पाण्याच्या संकटांचा सामना करावा लागेल, सन 2025 पर्यंत देशातील पाण्याची गरज 7900 कोटी लीटरने
वाढेल, सन 2035 पर्यंत भूजलाचा 60 टक्के
साठा संपेल.यावर उपाय म्हणून पाणी व्यवस्थापन व जलसाक्षरता
अत्यंत महत्वाची आहे.पाणी योग्य पाणी व्यवस्थापन व नियोजन
करून प्रत्येक व्यक्तीस शुध्द पाणी उपलब्ध करणे महत्वाचे आहे.
शुध्द
पाण्याचा पुरवठा ही मूलभूत गरज आहे. ही गरज भागल्याशिवाय आरोग्यमानात फार सुधारणा
होणार नाही. बोअरवेल पंपाचे पाणी खडकाखालून येत असेल तर ते सहसा जंतुदृष्टया शुध्द
असते. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र आणि दख्खनच्या पठारावर खूप खोल गेल्याशिवाय पाणी
लागत नसल्याने बोअरवेलचे पाणी साधारण शुध्दच असते. इतर विहिरींची गोष्ट मात्र
वेगळी आहे. त्यांमधले पाणी खडकाखालून येत असले तरी' वरचे' (अशुध्द)
पाणी त्यात मिसळते. उघड्या कच्च्या विहिरी, पाय-या यामुळे
सतत घाण मिसळत असते. या विहिरी सुरक्षित करायच्या तर पाय-या काढून टाकून त्या आतून
बांधून, कट्टा, फरशी करून, झाकून पाणी उपसण्यासाठी काही यंत्रणा बसवावी लागते. नाहीतर मग रोजच्या रोज
ब्लिचिंग पावडर टाकणे हाच उपाय उरतो. पण याचा खर्च आवाक्याबाहेर जातो व यामुळे औषध
टाकले जात नाही. याशिवाय निरनिराळे घरगुती उपायही (उकळणे,साठवून
ठेवणे, औषध टाकणे) पाण्यावर करता येतात. पण विहिरीतल्याच
साठ्यावर उपाय करणे कमी खर्चाचे व कमी त्रासाचे आहे. नुसत्या डोळ्यांनी पाहून पाणी
शुध्द किंवा अशुद्ध हे सांगणे अवघड आहे. यासाठी प्रयोगशाळेत पाणी तपासणी करावी
लागते. प्रत्येक व्यक्तीने आपण पिता असलेल्या पाण्याची तपासणी करून मगच पाणी पिले
पाहिजे. शाळेत जे पाणी आपण पिण्यासाठी वापर करणार आहोत त्याची देखील तपासणी केली
पाहिजे. पाणी तपासणी करण्यासाठी काचेची बाटली चांगल्याप्रकारे धुऊन घ्यावी . या
बाटलीमध्ये पाणी घेऊन ते बुच लाऊन पक्के बंद करावे. पाणी २४ तासाच्या आत
प्रयोगशाळेत तपासणी करायला पाठवावे. सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रयोगशाळा
आहेत. प्रयोगशाळेत पाण्यावर निरनिराळ्या तपासणी करून पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू
आहेत काय? मैला मिश्रित पाणी आहे काय ? क्षार व खनिजे यांचे प्रमाण किती आहेत हे
सांगितले जाते. पाण्यात कॉलरा किंवा
पटकीचे रोगजंतू देखील असू शकतात.
पाणी पिण्यास योग्य नसल्यास उपाय योजना
देखील करता येते. म्हणून शाळांनी सर्व प्रथम पाण्याची तपासणी करणे अत्यंत आवश्यक
असते. हल्ली पाणी तपासणीसाठी तयार किट्स मिळतात. या किटमध्ये पट्टी असते हि पट्टी
काही सेकंद पाण्यात बुडविल्यास तिचा रंग बदलतो. रंग बदलल्यास पाण्यात जीवाणू आहेत
व पाणी पिण्यास योग्य नाही असे समजले जाते.
पाण्याची रासायनिक व
भौतिक गुणधर्म तपासणी करण्यासाठी किट (क्लोरीन ) – पिण्याच्या
पाण्यामध्ये अनेक क्षार व रसायने असू शकतात. पाणी पिण्यासाठी योग्य आहे कि नाही हे
ठरविण्यासाठी त्याची रासायनिक तपासणी करावी लागते. हि तपासणी जागच्या जागी
करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने एक किट तयार करण्यात आली आहे. पाण्यात किती आहे
हे तपासणीमध्ये समजते. एका परीक्षा नळीत पाणी घेउन त्यात ०.१ मिली ओर्थोटोल्यूडीन
द्रव मिसळतात. पाण्यात क्लोरीन असल्यास पाण्याला पिवळा रंग येतो. पिवळ्या रंगाच्या
फिकट अथवा गडदपणानुसार त्यात किती क्लोरीन आहे हे किटमध्ये असलेल्या तबकडीच्या
रंगाशी तुलना करून ठरविले जाते.
पाण्यातील फ्लोराईड – पाण्यात
फ्लोराईड नावाचा एक क्षार असतो. याचे पाण्यातील प्रमाण कमी अधिक असते. फ्लोराईडचे
आरोग्यावर दूरवर परिणाम होतात. फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्यास दातावर डाग पडतात.
हाडे ठिसूळ होतात. हाडांना बारीक छिद्र देखील पडतात. फ्लोराईडचे प्रमाण कमी असेल
तर दात किडण्याचे प्रमाण वाढते. शहरातील पाणी पुरवठा करतांना याचे प्रमाण योग्य
ठेवत येते. मात्र खेड्यामध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा नसल्यास दुष्परिणामांना
सामोरे जावे लागते.
अशुध्द पाणी व कमी
पाणी या दोन्हींचे आरोग्यावर होणारे परिणाम घातक आहेत. आपल्याकडचे निम्मे आजार
अशुध्द पाणी आणि अस्वच्छतेमुळे होतात. पटकी, गॅस्ट्रो, पोलिओ,कावीळ, हगवण, जंत, त्वचारोग,विषमज्वर, इत्यादी
अनेक आजार अशुध्द पाणी व अस्वच्छता यांमुळेच होतात. यातून कुपोषण वाढते. शुध्द
पाणीपुरवठा व स्वच्छता या उपायांनी औषधोपचारांची गरज निम्म्याने कमी होईल व
लोकांचे आयुर्मान वाढेल. सर्वांना शुध्द आणि भरपूर पाणी मिळणे हा आपल्यासमोरचा
मोठा प्रश्न आहे.
पाणी शुध्दीकरणाच्या
घरगुती पध्दती
1. साठवण
आणि निवळणे - पाणी भांड्यात गाळून, साठवून
स्थिर ठेवल्यानंतर काही वेळ जाऊ दिला तर गाळ खाली बसतो. 24 तास
स्थिर ठेवून पाणी वापरल्यास त्यातले 90 टक्के जंतू नष्ट
झालेले असतात. तुरटी फिरवून ही क्रिया लवकर होते. ही सर्वात स्वस्त व सोपी
पध्दत आहे. साथीच्या काळात मात्र रासायनिक शुध्दीकरण केलेलेच बरे. पाणी साठवून,
निवळून औषध टाकले तर आणखी चांगले. पण यात वेळ लागत असल्याने हे उपाय
कमी वापरले जातात.
2.उकळणे - एकदा
उकळी फुटल्यानंतर किमान पाच मिनिटे उकळत ठेवणे हा खात्रीचा उपाय आहे. पण मोठया
प्रमाणावर करायचा झाल्यास हा खर्चीक उपाय आहे. त्यामुळे हा उपाय नेहमी परवडणारा
नाही.
3. शेवग्याच्या
बिया वापरुन पाणी शुध्दीकरण - तुरटीच्या ऐवजी शेवग्याच्या
बियांची पूड वापरुन पाणी निवळता येते. तुरटी ही आरोग्याला काही प्रमाणात हानीकारक
असल्यामुळे शेवग्यांच्या बियांचा वापर जास्त निर्धोक आहे प्रथमत: वाळलेल्या
शेवग्याच्या शेंगा घेऊन त्यातील बी काढून घ्यावी. बी ची टरफले काढून घ्यावीत.
टरफले काढल्यानंतर सफेद दिसणा-या बियांची बारीक पावडर करून घ्यावी. पाणी स्टीलच्या
किंवा तांब्याच्या भांडयात घ्यावे. साधारणत: 10 लिटर
पाण्यासाठी 15-20 बीयांची पावडर करून ती हळूवार पाण्यात
टाकावी. जर पाणी गढूळ/खराब दिसत असेल तर बियांच्या पावडरचे प्रमाण वाढवावे.
बियांची पावडर टाकल्यानंतर पाणी 1 तासानंतर गाळून घ्यावे.
4. रासायनिक
शुध्दीकरण - क्लोरीनच्या गोळया किंवा पातळ औषध वापरून पाणी
शुध्द करता येते. क्लोरीन गोळयांच्या पाकिटावर किंवा औषधांच्या बाटलीत किती
पाण्यात किती रसायन मिसळायचे ते दिलेले असते. औषध किंवा गोळी टाकल्यानंतर ते पाणी
सुमारे अर्ध्या तासाने वापरावे. औषध किंवा गोळी नसल्यास क्लोरीन द्रावण तयार करता
येते.
5. ब्लिचिंग
पावडरपासून जंतुनाशक द्रावण तयार करणे - ब्लिचिंग पावडर वापरुन पाणी निर्जंतुक करता
येते. यासाठी द्रावण तयार करण्याची कृती - एका तांब्यात एक लिटर पाणी
घ्यावे. त्यात व्यवस्थित साठवलेली 200 ग्रॅम ब्लिचिंग पावडर
मिसळावी. पाणी चांगले ढवळावे आणि पाच मिनिटे न हलवता ठेवावे. हे मिश्रण एका
प्लास्टिकच्या बाटलीत गाळून भरावे. न विरघळलेली पावडर तळाशी ठेवून द्रावण वेगळया
बाटलीत भरावे. आता ही बाटली बंद करून ठेवावी. ही बाटली दोन दिवस वापरता येईल. याचे
पाच मिली मिश्रण (एक मोठा चमचा) एक बादलीभर पाण्यात घालावे व चांगले ढवळावे. हे
पाणी अर्ध्या तासानंतर वापरावे. जंतूनाशक द्रावणाची बाटली परत घट्ट बंद करून
ठेवावी. नाहीतर त्यातील क्लोरीनचा वायू निघून जाईल व ते निरुपयोगी होईल.
6. क्षार
गाळणी
- बोअरवेल व विहिरींच्या पाण्यात क्षारांमुळे जडपणा असतो. खरे
म्हणजे अनेक क्षार शरीराला अपायकारक असतात. अन्न शिजवायलाही त्याने त्रास होतो व
चव बदलते. म्हणून पाण्याची क्षार तपासणी करून घ्यावी. ठरावीक मर्यादे पलीकडे क्षार
असतील तर उपाय करायला पाहिजेत. हल्ली क्षार गाळणी मिळू लागली आहेत. त्याचा
सुरुवातीचा खर्च जास्त असतो. (रु.5000 पर्यंत) पण देखभाल
खर्च कमी असतो.
7. सुजल
वॉटर फिल्टर - हा वॉटर फिल्टर तयार करण्यासाठी धान्याचा कोंडा,
वाळू, खडी व बाईंडर (सिमेंट)
ह्यांचा वापर करण्यात येतो. हा फिल्टर तयार करण्याची पध्दत अतिशय सोपी आहे. एका वेळेस 8 ते 10 लिटर
पाणी 4 तासात गाळले जाते.पाण्यातील फ्लोराईड व आर्सेनिक
यांचे प्रमाण कमी होते.
8. सामुहिक
पाणी शुध्दीकरण - घरोघर पाणी शुध्द करण्याऐवजी सामूहिक
पाणीपुरवठा शुध्द ठेवणे जास्त चांगले. पण स्वयंपाकाशिवाय इतरही कामासाठी हे पाणी
वापरल्यास शुध्द करण्याचा तेवढा खर्च वाया जातो. सामूहिक पाणीपुरवठयात आधी
शुध्दीकरण करून पाणी मोठ्या टाकीत साठविले
जाते. नंतर घरोघर पुरवठा केला जातो.
9. पाणी
शुध्दीकरण केंद्रे - शहरातील सुसज्ज पाणी-शुध्दीकरण
केंद्रांवर तीन टप्प्यांत पाणी शुध्द केले जाते. - तुरटी
मिसळून गाळ बसू देणे, - वाळूच्या थरातून पाणी गाळणे,
- क्लोरिन गॅस मिसळून पाणी निर्जंतुक करणे. यातील बांधकाम, यंत्रसामग्री वगैरेंचा खर्च मोठा असतो. पण लहान गावांसाठी इतर स्वस्त आणि
तेवढ्याच परिणामकारक योजना करता येतात. भरपूर पाणी असलेली खोल विहीर असेल तर ती
आतून बाहेरून बांधून, झाकण लावून, उपसा
यंत्रणा बसवून शुध्द ठेवता येते.
10. आदर्श
विहीर
- विहिरीत जमणा-या पाण्याचा झरा खडकाखालून येत असेल तर हे पाणी
बहुधा शुध्द असते. अशा पाण्याच्या विहिरीत बाहेरून रोगजंतू मिसळू दिले नाहीत तर
पिण्याच्या पाण्याच्या शुध्दतेची हमी देता येईल. जलस्वराज्य प्रकल्पात या
प्रकारच्या सोयी केल्या आहेत. - बाहेरून घाण मिसळू नये
म्हणून विहिरीत सुधारणा कराव्या लागतील. प्रथम विहिरीला आतून पक्के बांधकाम करून
पृष्ठभागावरचे पाणी झिरपणार नाही याची व्यवस्था करावी. जमिनीवर तीन-चार फूट कठडा
करून घाण व बाहेरचे पाणी आत जाण्यापासून रोखावे, तसेच वरून
झाकण लावावे. - पाण्यात न उतरता पाणी काढण्याची व्यवस्था
(उदा. पंप, रहाट इ.) करावी लागेल. - सांडलेले
पाणी आत झिरपू नये म्हणून विहिरींच्या कडेने चर बांधून पाण्याला वाट करून द्यावी
लागेल. - विहिरीच्या आजूबाजूला सुमारे दीडशे फुटांपर्यंत
संडास, सांडपाण्याचा नाला, इत्यादी
दूषित पाण्याच्या जागा असू नयेत. एवढी काळजी घेतली तर पिण्याचे पाणी सुरक्षित व
शुध्द राहील. शक्य असेल तर पंप बसवून हे पाणी नळाने गावात जागोजाग पोचवता येते.
11. वनस्पती
गाळण (स्लो सँड फिल्टर) - हल्ली काही लहान गावांमधूनही
पाणीपुरवठा केंद्रे झालेली आहेत. मात्र पाणी-शुध्दीकरणाची पध्दत खर्चीक असल्याने
ब-याच लहान केंद्रांवर शुध्दीकरण अगदी जुजबी आणि असमाधानकारक असते. गावासाठी पाणी
शुध्दीकरणासाठी सोपे व स्वस्त तंत्रज्ञान उपलब्ध आहे. एक उदाहरण म्हणजे यांत्रिक
गाळण्याऐवजी पाणवनस्पतींचा वापर करणे. या पाणवनस्पती वाळूच्या थरांवर पाणी
साठल्यावर आपोआप वाढतात व त्यामधून गाळले जाणारे पाणी शुध्द होते. यांत्रिक
गाळण्यांपेक्षा या गाळण्यांचे काम सावकाश होते; पण शुध्दीकरण
मात्र त्यापेक्षा फारच चांगले असते. यात 99 टक्के जंतू नष्ट
होतात. छोटया गावासाठी वनस्पतीयुक्त गाळणी वापरणेच अधिक योग्य आहे. त्याचा देखभाल
खर्च अगदी कमी असून अत्यंत शुध्द पाणी मिळते.
वरील
सर्व बाबींचा विचार करता शाळेत शुध्द पिण्याचे पाणी अत्यंत आवश्यक झालेले आहे.
शाळा स्तरावर पाणी व स्वच्छता संबंधी खालील मुद्दे विचारात घेतले जातात.
१)
पाणी पिंपात साठवल्यास उंचावर ठेवावे.
२)
पाणी घेण्यासाठी पिंपाला / मठाला नळ
असावा.
३)
नळ नसल्यास पाणी घेण्यासाठी ओगराळे
वापरावे.
४)
पाणी घेतांना हात स्वच्छ असावे.
५)
दररोज पिंप / माठ स्वच्छ धुवावे.
६)
पाण्याची टाकी असल्यास टाकी धुण्याचा
दिनांक लिहावा.
७)
विद्यार्थी उंचीनुसार नळ/ तोटी उंची ठरवावी.
८)
पिण्याच्या पाण्याचा व आसपासचा परिसर
स्वच्छ असावा.
विद्यार्थी
आरोग्य , शिक्षण व विकासाचा विचार करुन सदर सुविधा शाळेत उपलब्ध करुन देणे
क्रमप्राप्त ठरते.
केंद्र
शासनाचे मार्गदर्शक सूचना व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार
v
गावातील उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतामधून अन्न
शिजविण्यासाठी प्रति विद्यार्थी 2 लिटर
v
स्वच्छतेसाठी प्रतिविद्यार्थी 5 लिटर
v
पिण्यासाठी प्रतिविद्यार्थी 2 लिटर याप्रमाणे पाणी आवश्यक आहे.
v
पिण्याच्या पाण्याची साठवण दररोज करावी.
v
किमान 2000 लिटर पाण्याची क्षमता असलेली साठवण
टाकी असावी.
v
30 विद्यार्थ्यांसाठी 1 याप्रमाणे नळजोडणी असावी.
v
पिण्याच्या पाण्याकरीता नळजोडणी ही बालकांची उंची
विचारात घेऊन वेगवेगळ्या स्तरावर करावी.
v कायम
स्वरुपी पिण्याचे पाणी व्यवस्था नसल्यास पाण्याची टाकी, पिंप , माठामध्ये साठवणूक करावी.
v ग्लास
व ओगराळे
इत्यादी उपलब्ध असावे.
v सांडपाणी
व्यवस्थापन , शोषखड्डा असावा.
वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व
माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.
पिण्याचे पाणी याबाबतीत खालील महत्त्वाचे
प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1) शाळेत
पिण्याचे पाणी उपलब्ध आहे काय ?
2) विद्यार्थी
व नळाच्या तोट्या यांचे प्रमाण : ------------------ ( 12:1 याप्रमाणे लिहा )
असल्यास, अ) हात
धूण्यासाठी -----------------
ब) पिण्याच्या
पाण्यासाठी
3) पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत
अ ) कूपनलिका / हातपंप ब) नळ
(सामायिक स्त्रोत)
क) इतर (कृपया उल्लेख करावा)
4) शाळेतील पाणी शुध्दीकरणाची
प्रक्रीया
अ ) उकळणे ब) क्लोरीनीकरण
क) गाळणे ड) व्यवस्था नाही.
5.) पाणी
उंचावरील टाकीमध्ये (डोक्याचे वर) साठवले आहे काय ?
होय / नाही.
6.) आधीच्या
वर्षी टाकी धूतल्यांची संख्या -
(किती वेळा धूतली ती संख्या
लिहावी.)
वरील प्रश्नासह शाळासिध्दी कार्यक्रमात वर्णन विधाने
दिलेली असतात. या वर्णन विधानानुसार शाळा स्वयं
मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन होत असते. मुख्याध्यापक व
निर्धारकांनी वर्णनविधानांचे अभ्यासपूर्वक वाचन करुन आपल्या शाळेला कोणते
वर्णनविधान लागु होतात हे ठरवावे. वर्णनविधानाची निवड
करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन
विधाने व वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
१) a) पेयजल सुविधा उपलब्ध आहे मात्र पुरवठा अपुरा आहे.
b) पाण्याचा पुरेसा व नियमित पुरवठा आहे,
भूजल असल्यास शुध्दीकरण सुविधा उपलब्ध आहे.
(वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास
1 गुण देण्यात यावे.)
२) a) सुरक्षित पेय जलाचा अखंड पुरवठा आहे. आवश्यकता असल्यास
शुध्दीकरणासाठी व देखभालीसाठी आधूनिक पेयजल व्यवस्था केलेली आहे.
b) पेयजल कोणत्याही गुणवत्ता तपासणी शिवाय
पुरवठा केलेल्या अवस्थेत वापरले जाते.
(वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास
2 गुण देण्यात यावे.)
३. a) आवश्यक असल्यास पाणी शुध्द केले जाते.पाणी साठवणूक सुविधा
नियमितपणे स्वच्छ केली जाते.
b) शाळा शुध्द पेयजलाच्या नियमित पुरवठ्याची
खात्री करते. पेयजल सुविधेच्या आसपास स्वच्छता ठेवली जाते.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास
3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने
ही गुणवत्तेचे वर्णन करतात. तसेच गुणवत्तेचा चढता
क्रम दर्शवितात. त्यामुळे शाळेला स्वत:चे
स्थान समजते. गाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने
नेमकेपणाने काय करावे हे समजते. वर्णनविधानाची निवड
केल्यानंतर शाळेला स्वत: चे गुणवत्तेमधील स्थान समजते.
त्यानंतर प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागते. या नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. प्राधान्यक्रमानुसार
प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागते. या
कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतो. अशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.
लेखाबाबत आपल्या प्रतिक्रीया asiflshaikh1111@gmail.com मेलवर कळविण्यात याव्यात ही विनंती. शाळासिध्दी
लेखमाला (ENGLISH) मध्ये व आधीचे सर्व भाग asiflshaikh.blogspot.com वर उपलब्ध आहेत.
असिफ शेख,
कार्यक्रम
अधिकारी
RMSAतथा राज्यसंपर्क अधिकारी शाळासिध्दी.
पाण्याला
नाव किती ?
जीवांचे पोषण
करते म्हणून जीवन.
जीवसृष्टीचा
जन्म त्यातून झाला म्हणून भूवनम.
शुध्द करतं
म्हणून शुध.
रोगनाशक आहे
म्हणून भेषजम किंवा औषधम.
मरगळ घालवून
ताजतवानं करतं म्हणून कबंधम.
अनेकदा
जीवांना मृत्यू पासून रोखतं म्हणून अमृतम.
पाणी पिल्यानंतर शांत वाटत म्हणून
कृपीटम.
थंड
गुणधर्मामुळे शीत.
पिण्यासाठी
योग्य ते पानीय.
ढगांच्या
घर्षणामुळे निर्माण होते म्हणून घर्षणम.
वाहतांना लीला
करीत, खळखळाट करीत जातं म्हणून सलील.
स्वत: वाहतं
म्हणून त्याला वाणी.
वाहून थांबतं
म्हणून काष्टा.
समुद्रात
मिसळतं म्हणून अर्णव.
ढगात आहे
म्हणून उपर.
वर्षाव होतो
म्हणून धृतम.
झ-यातून
खळखळ वाहतं म्हणून अम्बु म्हणतात.
बाष्प होऊन वर
जातं म्हणून उदक म्हणतात.
खाली वाहत
जातं म्हणून नीर म्हणतात.
नदी
समुदापासून मिळणा-या पाण्याला सिंधू म्हणतात.
कमी पावसाच्या
प्रदेशातील पाण्याला आप म्हणतात.
याबरोबरच इरा, तोयम,
सदनम,कम, सोमम, नारम, क्षरम, धृतम, वाजम, कबुरम, तण्णीर, वेळ्ळम, आब, उदक, जल अशी अनेक नावे पाण्याला आहेत. यातील काही नावे
सध्या वापरात नाहीत.
No comments:
Post a Comment