Monday, February 25, 2019

शाळासिध्दी राष्ट्रीय चर्चासत्र दिनांक 14 ते 15 फेब्रुवारी 2019.

शाळासिध्दी राष्ट्रीय चर्चासत्र दिनांक 14 ते 15 फेब्रुवारी 2019.
NATIONAL CONSULTATIVE MEET ON SHAALASIDDHI 14 – 15 FEB, 2019. 
School Standards and evaluation Unit, National Institute of Educational Planning and Administration, NIEPA, New Delhi. 
निपा नवी दिल्ली यांचेकडून शाळासिध्दी विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर चर्चासत्रासाठी शाळासिध्दी कार्यक्रमाचा राज्य नोडल अधिकारी म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला. सदर राष्ट्रीय चर्चासत्र हे दिनांक 14 ते 15 फेब्रुवारी 2019 या कालावधीमध्ये निपा नवीदिल्ली यांचे वतीने हॉटेल रेसिडेंसी रिसॉर्ट येथे घेण्यात आले. चर्चासत्रासाठी प्रत्येक राज्यातील राज्य प्रकल्प संचालक व नोडल अधिकारी उपस्थित होते. शाळासिध्दी कार्यक्रमात याही वर्षी महाराष्ट्र राज्याचा देशात प्रथम क्रमांक आला. यशस्वी नोडल अधिकारी म्हणून राज्यातील कार्यक्रमाचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. उत्कृष्ठ सादरीकरण ,सहभाग याकरीता डॉ संतोष पांडा, CHANCELLOR, NCTE नवी दिल्ली यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सोबत प्रोफेसर डॉ. प्रणती पांडा शाळासिध्दी विभाग प्रमुख, निपा नवी दिल्ली, प्रोफेसर के रामचंद्रा सल्लागार सदस्य राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा समिती निपा नवी दिल्ली, प्रोफेसर रश्मिता दास शाळासिध्दी विभाग नवी दिल्ली.
महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव मा. वंदना कृष्णा मॅडम, मा. शिक्षण आयुक्त, डॉ विशाल सोळंकी साहेब, मा. सह सचिव डॉ सुवर्णा खरात मॅडम, मा. संचालक MSCERT, डॉ सुनिल मगर साहेब, मा. प्राची साठे मॅडम, विशेष कार्य अधिकारी मंत्री कार्यालय,मुंबई, मा. संचालक MIEPA डॉ नेहा बेलसरे मॅडम यांनी दिलेल्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे शाळासिध्दी कार्यक्रमाला यश प्राप्त होत आहे. याबरोबरच राज्यातील सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, प्राचार्य, अधिव्याख्याता, केंद्रप्रमुख व सर्व जिल्हा व तालुकास्तर निर्धारक, मुख्याध्यापक करत असलेल्या उत्कृष्ठ कार्यामुळेच महाराष्ट्र आघाडीवर आहे.

No comments:

Post a Comment