आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण
प्रदर्शन व कार्यशाळा
प्रत्येक मुलाला आंतरराष्ट्रीय
दर्जाचे (गुणवत्तापूर्ण) शिक्षण मिळावे व आंतरराष्ट्रीय स्तरावर
होणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये (PISA- Program for International
Student Assessment) सहभागी होता यावे या
उद्देशाने राज्यामध्ये वेध हा शैक्षणिक समुह कार्य करत आहे. याच विषयावर कैवल्य
एज्युकेशन फौंडेशन करत असलेल्या कार्याची माहिती घेण्यासाठी आदरणीय नंदकुमारसाहेब
यांचे उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथी भवन, मुंबई येथे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
दर्जाचे शिक्षण या विषयावर प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन दिनांक ०१/१०/२०१९ रोजी करण्यात
आले होते. या प्रदर्शन व कार्यशाळेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर
सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील मुलांची
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी (PISA) तयारी करून घ्यावी व संपूर्ण जगामध्ये देशातील विद्यार्थी यशस्वी ठरावेत
यासाठी सध्या आदरणीय नंदकुमारसाहेब यांच्या प्रेरणेतून कार्य सुरु आहे. त्याचाच एक
भाग म्हणून हे प्रदर्शन व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत सुरुवातीला कैवल्य
एज्युकेशन फौंडेशन (KEF) यांनी चार वर्षापासून करत
असलेल्या कार्याची माहिती दिली.
१. Master
Leadership Program - या कार्यक्रमामध्ये विविध
स्तरावर नेतृत्व विकासासाठी कार्य केले जाते. कार्यशाळा, शाळाभेटी, प्रदर्शन, अभ्यास
सहलींचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमामध्ये खालीलप्रकारचे नेतृत्व विकास कार्यक्रम सुरु
आहेत.
v मुख्याध्यापक
नेतृत्व विकास कार्यक्रम
v शिक्षक
नेतृत्व विकास कार्यक्रम
v सामाजिक
नेतृत्व विकास कार्यक्रम
v शालेय
नेतृत्व विकास कार्यक्रम
वरील कार्यक्रमाची माहिती KEF यांच्याकडून
प्रदर्शन स्वरुपात देण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण व नेतृत्व विकास
कार्यक्रम हा गडचिरोली, अमरावती, ठाणे , मुंबई येथे पथदर्शक स्वरुपात कशाप्रकारे
सूरु आहे याची माहिती KEF प्रतिनिधींनी दिली. याबरोबरच Child Cabinet या लोकशाही मूल्यांवर आधारित अत्यंत महत्वपूर्ण अशा उपक्रमाची देखील
माहिती देण्यात आली. यासर्व कार्यक्रमासाठी हावर्ड युनिवर्सिटी मध्ये असलेल्या
अभ्यासक्रमाचा संदर्भ देण्यात आला.
२. चित्रीकरण (video
making) - नेतृत्व
विकासात आधुनिक तंत्रज्ञान व चित्रीकरणाचे महत्व हावर्ड युनिवर्सिटीने अधोरेखित
केले आहे. शिकतांना, शिकवितांना, व्यवस्थापनामध्ये व नेतृत्व विकासामध्ये चित्रीकरणाचे
(video making) अत्यंत
महत्व आहे. हे महत्व स्पष्ट करतांना हावर्ड युनिवर्सिटीचे डीन यांनी म्हटले आहे
की, " मै हमेशा अपने खुदके व्हिडीओ को देखकर सिखता हुं " नेतृत्व
विकास कार्यक्रमामध्ये प्रत्येक विषयावर आधारित छोटे छोटे व्हिडीओ तयार केल्यास या
व्हिडीओचा उपयोग शिकण्यासाठी करता येईल. विद्यार्थी , शिक्षक, मुख्याध्यापक, समाज
या सर्वांचे शिकणे सुकर होण्यासाठी व्हिडीओ हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. याच
अभ्यासाचा संदर्भ घेऊन ठाणे जिल्ह्यातील शिक्षक आपल्या अध्यापनामध्ये प्रभावीपणा
आणण्यासाठी स्वत:चे अध्यापन करत असतांनाचे व्हिडीओ बनवत आहेत. हे व्हिडीओ आपसात
शेअर करून त्यावर चर्चा करत आहेत. त्यामुळे अध्यापनामध्ये अत्यंत वेगाने सुधारणा
होऊन यशस्वी होत आहेत.
३. BALA-
Building As Learning Aid - अध्ययन व अध्यापनात शालेय
इमारतीलाच शैक्षणिक साधन म्हणून विकसित केल्यास त्याचा देखील मोठा प्रभाव पडतो.
त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीला इमारतीचे शैक्षणिक महत्व पटवून देण्यासाठी केईएफ
यांनी जवळ पास ९७६ शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका आयोजित केल्या आहेत. या
बैठकामधून शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य घेण्यात आलेले आहे.
४. एकविसाव्या शतकातील कौशल्ये - २१st
CENTURIES SKILLS यावर अत्यंत सविस्तर चर्चा झाली. भविष्यातील
आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, जगातील स्पर्धा , आंतरराष्ट्रीय शिक्षण यादृष्टीने
भारतातील व विशेषत: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये कोण कोणती कौशल्ये असायला
हवी यावर देखील चर्चा झाली. यामध्ये बौद्धिक कौशल्ये, वैयक्तिक कौशल्ये,सामाजिक
कौशल्ये, मनोसामाजिक कौशल्ये, इतर कौशल्ये यावर देखील चर्चा झाली. या विषयावर EMORY
UNIVERSITY यांनी तयार केलेला अभ्यास केईएफ प्रतिनिधींनी स्पष्ट
केला. आ. नंदकुमारसाहेब यांनी सुधैव कुटुंबकम ही संकल्पना अधिक स्पष्ट केली.
विश्वबंधुत्व म्हणजे काय हे स्पष्ट केले. प्रत्येक व्यक्तीला आदर, सन्मान, प्रेम,
यश, आनंद हवा असतो. यासाठी अस्तित्व आणि
सहा अस्तित्व या संकल्पना अधिक स्पष्ट केल्या.
५. PISA -
Program for International Students Assessment
"Let's make our schools ready for
PISA" आपल्या देशातील / राज्यातील सर्वच विद्यार्थी
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण व स्पर्धा परीक्षेसाठी तयार व्हावेत यासाठी काय
करता येईल यावर देखील चर्चा झाली. KEF यांनी मेक्सिको आणि
ब्राझील या देशातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून त्याची माहिती या प्रदर्शनात
दिली. या देशात PISA करिता चार टप्प्यावर काम केले जाते.
1) Maker's Lab
2) Teacher's Learning Lab
3) Developing Resource Center
4) Technology Enabled Tools To Identify Learning
Needs.
याबरोबरच PISA परीक्षेसाठी असलेल्या Mathematics , Mathematical Reasoning,
Content Knowledge, Context, 21st Centuries Skills, Reading, Science ,
Collaborative Problem Solving या विषयावर देखील चर्चा झाली. बोलो
या अप्लीकेशनचा वापर व उपयोग यावर चर्चा झाली.
राज्यातील व देशातील व राज्यातील
सर्वच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी कार्या
करण्याची प्रेरणा घेऊन प्रदर्शन व कार्यशाळेचा समारोप झाला.
संकलन
असिफ
शेख (९८६०३८८०९६)
asiflshaikh.blogspot.com
No comments:
Post a Comment