https://www.youtube.com/watch?v=HmeNEY9wr2Q
*स्वच्छ भारत पंधरवडा*
1 सप्टेबर ते 15 सप्टेबर 2018.
मा. पंतप्रधान महोदयांनी 2 आक्टोबर 2019 पर्यंत Clean India ध्येय साध्य करावयाचे ठरविले आहे.
शासन
निर्णय 4 ऑगष्ट 2017 व 16 ऑगष्ट 2018 नुसार राज्यातील सर्व शाळामधून
स्वच्छता पंधरवडा साजरा करावयाचा आहे. सर्व शाळांमधून खालीलप्रकारचे उपक्रम
आयोजित करण्यात यावे.
1) स्वच्छता शपथ - 1 सप्टेबर
रोजी सर्व शाळा व संस्थामधून स्वच्छतेची शपथ घ्यावी तसेच यानंतर दररोज
सकाळी शालेय परिपाठामधून ही शपथ घेण्यात यावी. - सहभाग सर्व विद्यार्थी
शिक्षक व कर्मचारी.
2) शाळा व्यवस्थापन समिती बैठक -
पंधरवड्याच्या पहिल्या सप्ताहामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक
संघ बैठक घेऊन स्वच्छतेचे महत्व सांगणे.
3) स्वच्छता
विषयक सुविधा - शाळा व संस्थेतील स्वच्छता विषयक सुविधांची तपासणी करावी.
त्या अद्ययावत कराव्यात. आवश्यकता वाटल्यास दुरुस्ती प्रस्ताव सादर करावे.
4) स्पर्धांचे आयोजन - जिल्हा/तालुका स्तरावर स्वच्छ परीसर , स्वच्छ शाळा स्वच्छ शौचालय स्पर्धांचे आयोजन करावे.
5) चित्रकला स्पर्धा - स्वच्छतेवर आधारीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करावे.
6) वादविवाद स्पर्धा - स्वच्छतेवर आधारीत वादविवाद स्पर्धेचे आयोजन करावे.
7) स्वच्छता संदेश - शाळा व गावामध्ये स्वच्छता संदेश लिहावेत.
8) छायाचित्रे - शाळेच्या व संस्थेच्या वेबसाईटवर स्वच्छते विषयक छायाचित्रे प्रकाशित करावी. बॅनर्स लावावेत.
9) परीसर स्वच्छता - शालेय परीसर व शाळेच्या जवळचा परीसर स्वच्छ करण्यात यावा.
10) स्वच्छ भारत गीताचे प्रसारण करण्यात यावे.
11)
विद्यार्थी राजदूत - स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विद्यार्थी
राजदूत (Student Ambassadors) यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात.
12) पंधरवडा अहवाल- स्वच्छता पंधरवडा दिनांक व त्या दिनांकास घेतलेल्या उपक्रम याबद्दलचा अहवाल सादर (मोजक्या फोटोसह) करावा.(asiflshaikh1111@gmail.com)
असिफ शेख
नोडल ऑफिसर , स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय, MPSP,RMSA मुंबई.
*मी
घाण करणार नाही आणि दुस-याला करु देणार नाही. सर्व प्रथम स्वतःपासुन,
माझ्या कुटुंबापासुन, माझ्या गल्ली, वस्तीपासुन , माझ्या गावापासुन , कार्य
स्थळापासुन स्वच्छतेला सुरुवात करेल. जगातील इतर देशाप्रमाणे मीही
अस्वच्छता करणार नाही. गावोगावी याबाबत इतरांना प्रेरीत करील. इतर 100
व्यक्तींनाही स्वच्छतेची शपथ घ्यायला लावेल. माझे स्वच्छतेचे एक पाऊल
संपूर्ण देशाला स्वच्छ करेल, याचा मला विश्वास आहे.*
No comments:
Post a Comment